नवी मुंबईतील सानपाडा येथे कै. सिताराम मास्तर उद्यानात सानपाडा गार्डन समूहाच्या वतीने २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता सामूहिकरित्या दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक श्री. सोमनाथ वासकर, उपजिल्हाप्रमुख श्री. मिलिंद सुर्याराव, शाखाप्रमुख श्री. अजय पवार, शाखाप्रमुख श्री. बाबाजी इंदोरे, भाजपचे श्री. भाऊ ( गणपत )भापकर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सामाजिक कार्यकर्ते श्री. रणवीर पाटील, उपविभाग्रमुख चांद भाई, गणेश हुले, दत्तात्रय कुरळे, बेल भंडारे, तेजाभाई आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सोमनाथ वासकर, मिलिंद सूर्याराव, अजय पवार, रणवीर पाटील, तावडे यांनी दिवाळी फराळ कार्यक्रम एकजुटीने, एकमेकांच्या सहकार्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. यापुढे असेच कार्यक्रम करून आपली सानपाडा वासियांची एकजूट कायम ठेवावी, अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
आपला
मारुती विश्वासराव


COMMENTS