नांदेड /प्रतिनिधी- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचे काही दिव्यांग बांधवांचे मानधन रखडले आहे. सदर मानधन तात्काळ दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात...
नांदेड /प्रतिनिधी- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचे काही दिव्यांग बांधवांचे मानधन रखडले आहे. सदर मानधन तात्काळ दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे विलंबाची चौकशी करण्यात यावी अन्यथा दि.08 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो दिव्यांगाचे रिकाम्या खात्याचा आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नांदेड शहर व जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत चे मानधन शासनाकडून पंधरा ते वीस दिवसांपूर्वी निवडक लाभार्थ्यांना जमा करण्यात आले आहे. परंतु त्यापैकी अनेक जणांचे मानधन अद्याप खात्यावर पोहोचले नाही. मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिव्यांग बांधवांचे रखडलेले मानधन तात्काळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे तसेच मानधन वितरणामध्ये झालेल्या विलंबाची चौकशी करून भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या मागण्या बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी केली आहे. अन्यथा या विरोधामध्ये दि.08 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये रिकाम्या खात्याचा आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS