नांदेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या १० वीच्या परीक्षेत 'कॉपीमुक्त अभियान...
नांदेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या १० वीच्या परीक्षेत 'कॉपीमुक्त अभियान' राबवले जात असतानाच, नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील श्री शाहू महाराज हायस्कूल परीक्षा केंद्रावर मोठा प्रकार उघडकीस आला आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिक्षण माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रसंचालकांसह एकूण ७ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
नेमकी काय आहे घटना?
दिनांक ११ मार्च २०२६ रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान-१ विषयाचा पेपर सुरू असताना जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांनी भोकर येथील केंद्र क्र. ५०७३ (श्री शाहू महाराज हायस्कूल) ला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान हॉल क्र. १३ मध्ये एका परीक्षार्थ्याकडे कॉपीचे साहित्य आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे, भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला, ज्याचा अर्थ केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी परीक्षार्थ्यांची योग्य प्रकारे तपासणी केली नव्हती.
या ७ कर्मचाऱ्यांवर पडली संक्रांत:
जिल्हा दक्षता समितीने दिलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावली १९८१ अन्वये खालील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे:
१. श्री. किनेवाड के.एन. (केंद्रसंचालक)
२. श्री. गोडगे एस.जी. (पर्यवेक्षक)
३. श्रीमती वटाणे (पर्यवेक्षक)
४. श्रीमती बिडवई एस.आर. (तपासणी कर्मचारी/पर्यवेक्षक)
५. श्रीमती लांबकानीकर एम.एम. (तपासणी कर्मचारी/पर्यवेक्षक)
६. श्री. शेख सलीम (तपासणी कर्मचारी/पर्यवेक्षक)
७. श्री. धुपे एस.एस. (तपासणी कर्मचारी/पर्यवेक्षक)
निलंबनाचे मुख्य कारण:
शिक्षण विभागाने पत्रात नमूद केले आहे की, शासनाचे स्पष्ट निर्देश आणि जिल्हा दक्षता समितीने वारंवार सूचना देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांनी परीक्षा प्रक्रियेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परीक्षार्थ्यांची नीट तपासणी न करणे आणि पर्यवेक्षकीय कामात अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर परीक्षा केंद्रांवर खळबळ उडाली असून, 'कॉपीमुक्त अभियान' गांभीर्याने न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

COMMENTS