लातूर, दि. १३ मार्च : कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, लातूर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड...
लातूर, दि. १३ मार्च : कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, लातूर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर येथे समाजशास्त्र विषयाची मुख्य नियामक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे औचित्य साधून सन २०२४ व २०२५ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या आठ प्राध्यापकांचा सेवागौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव मा. अनुपमा भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की, “मी अनेक शिक्षण मंडळांमध्ये काम केले आहे; मात्र असा हृदयस्पर्शी व सुंदर उपक्रम यापूर्वी पाहिलेला नाही. कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषदेने अत्यंत उत्कृष्ट नियोजन करून हा स्तुत्य उपक्रम साकारला आहे.”
या उपक्रमासाठी परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. प्रकाश खेत्री, सचिव डॉ. हेमंत सोनकांबळे, विभागीय अध्यक्ष प्रा. आबासाहेब गाठे, तसेच प्रा. अशोक कदम व इतर पदाधिकाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. भंडारी मॅडम पुढे म्हणाल्या की, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कर्मचारी ३०–३२ वर्षे सेवा करूनही त्यांचा साधा सत्कार केला जात नाही. परंतु आजच्या कार्यक्रमात प्रत्येक सत्कारमूर्तीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करतो.
या सेवागौरव सोहळ्यात प्रा. अशोक शंकरराव कदम, प्रा. उमाकांत गणपती कांबळे, डॉ. नामदेव दत्तात्रय नागरगोजे, प्रा. रामदास गोविंदराव मोरे, प्रा. साहेबराव दगडोजी बडेराव, प्रा. प्रकाश लक्ष्मणराव खंडगावे, प्रा. चांदसाहेब इब्राहिम कोरबू आणि प्रा. अशोक पंढरी गेडाम या प्राध्यापकांचा मानपत्र, शाल, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रतिनिधीक सत्कारमूर्ती म्हणून मनोगत व्यक्त करताना प्रा. अशोक कदम म्हणाले की, “परिषदेने केलेला हा सेवागौरव आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. भविष्यातही असा उपक्रम सातत्याने राबविला जावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. प्रकाश खेत्री, सचिव डॉ. हेमंत सोनकांबळे व विभागीय अध्यक्ष प्रा. आबासाहेब गाठे यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास कक्ष अधिकारी कारसेकर सर, समाजशास्त्र विषयाचे बोर्ड समन्वयक आबदरे सर तसेच मंडळातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आबासाहेब गाठे यांनी केले, तर उपस्थितांचे व अध्यक्षा अनुपमा भंडारी मॅडम यांचे आभार डॉ. हेमंत सोनकांबळे यांनी मानले.

COMMENTS