*मानवी जीवनात खरा आनंद ध्यानधारणेद्वारे प्राप्त* -प्रा.सुनील नेरळकर
नांदेड:( दि.१४ सप्टेंबर २०२४) ध्यान म्हणजे व्यर्थ विचार आणि घटनांचा संग्रह असलेले मन रिकामे करण्याची प्रक्रिया होय. ध्यानधारणेचे महत्त्व भारताने संपूर्ण जगाला सांगितले आहे; मात्र दुर्दैवाने आपणच त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. ध्यान प्रक्रियेद्वारे उसने ज्ञान प्राप्त न होता स्वतःची खरी ओळख स…
