शेतीमाल स्वस्तात लुटणे आणि कारखानदारी जगवणे या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, हे सरकारचे पाप आहे. शेतकरी तर मोठ्या प्रमाणावर हिंदूच आहेत व स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारं सरकार आहे, मग संपूर्ण कर्जमुक्ती करायला काय अडचण आहे? धर्माच्या आडून शेतकऱ्यांना फसवणे हे आता शक्य होणार नाही. फोडा आणि झोडा नितीचा अवलंब शेतकरी खपवून घेणार नाही.शेतीचा विकास हे गोंडस कारण लावून शासनाने ’कृषी पायाभूत सुविधा निधी योजना’ (एग्रीकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड) नावाने योजना निर्माण करून यात लाखो कोटी रुपयाची तरतूद केली असून कोणत्याही सामान्य शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ न देता संबंधित बँका व मोठमोठ्या कंपन्यांनी हा पैसा लाटला आहे. समृद्धी सारख्या योजना कुचकामी आहेत, प्रसंगी अशा योजना थांबवून हा पैसा कर्जमाफीसाठी वळता करावा. प्रभू रामचंद्रांना मानणाऱ्या सरकारने रघुकुल वचन स्मरावे व निवडणुकीत संपूर्ण कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन पाळावे. अन्यथा येणाऱ्या निवडणुकी मध्ये शेतकरी सरकारला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. असे यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील म्हणाले.
विना अट संपूर्ण कर्जमुक्ती, आजच्या तारखेत सातबारा कोरा करून शासनाने आपला शब्द पाळावा - शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना.

COMMENTS