किनवट दि. 27 ता प्रपुरोगामी महाराष्ट्रात बुवाबाजीचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. किनवट तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे मुख्य द्वार आज पर्यंत उ...
किनवट दि. 27 ता प्रपुरोगामी महाराष्ट्रात बुवाबाजीचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. किनवट तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे मुख्य द्वार आज पर्यंत उघडले नसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बांधकाम पूर्ण होऊनही बरीच वर्षे ही इमारत बंदच होती. इमारत बांधकामात वास्तुदोष असल्याने बराच काळ इमारत बंद ठेवण्यात आली होती. तत्कालीन प्रभारी असलेल्या तहसीलदाराने मोठ्या हिमतीने इमारत ताब्यात घेऊन कारभार सुरू केला पण त्यांची सेवा संपत आल्याने ते अल्पकालीन ठरले. त्यानंतर आलेल्या कोणत्याही तहसीलदाराने अपशकूनाच्या भीतीने पश्चिम दिशेचा दरवाजा उघडलाच नाही. कुण्या तरी नामवंत बाबा ने हा दरवाजा न उघडण्याचा सल्ला दिल्याचे ऐकीवात आहे. या सल्ल्यामागे नाशिक कनेक्शन असल्याचे बोलल्या जात आहे. खरंतर मुख्य बाजाराच्या दिशेने असलेला दरवाजा बंद ठेवल्यामुळे आलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व इमारतीला पायपीट करावी लागत आहे. या कार्यालयात वयोवृद्ध, दिव्यांग, अबाल व महिला मोठ्या संख्येने हेलपाटे मारत असतात. वेळेवर कोणताच अधिकारी उपस्थित नसतो आणि वरून बाजाराच्या दिशेने असलेला दरवाजा बंद असल्याने अधिकची पायपीट करावी लागते.
हा दरवाजा तात्काळ उघडा करावा अन्यथा या दारासमोर आंदोलन करण्याचा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी दिला आहे. यावेळी श्रीनिवास अण्णा जमादार, दादाराव डोंगरे व त्रिभुवनसिंग ठाकूर उपस्थित होते
हा दरवाजा तात्काळ उघडा करावा अन्यथा या दारासमोर आंदोलन करण्याचा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी दिला आहे. यावेळी श्रीनिवास अण्णा जमादार, दादाराव डोंगरे व त्रिभुवनसिंग ठाकूर उपस्थित होते

COMMENTS