मुदखेड (नांदेड): जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीमुळे आणखी एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. मालकौठा–दरेगाव बायपासवर शनिवारी अवैध वाळू वाहतूक क...
मुदखेड (नांदेड): जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीमुळे आणखी एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. मालकौठा–दरेगाव बायपासवर शनिवारी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा टिप्परने दुचाकीस्वारांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलांसाठी राशन घेऊन जात होते मृतक
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती धर्माबाद येथील रहिवासी होता. त्यांची मुले नांदेडमध्ये शिक्षण घेत आहेत. वडील आपल्या मुलांसाठी धर्माबादहून धान्य (राशन) घेऊन नांदेडकडे जात होते. दरेगाव–मालकौठा वळणावर अवैध वाळूने भरलेल्या अनियंत्रित हायवाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हायवाचे चाक मृत व्यक्तीच्या अंगावरून गेल्याने त्यांचा मृतदेह चिरडून गेला.

संतोष टाक प्रकरणाच्या आठवणी ताज्या
या घटनेमुळे परिसरात यापूर्वी घडलेल्या संतोष टाक यांच्या दुर्दैवी घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुदखेड परिसरातून दररोज 20 ते 25 अवैध वाळूने भरलेले हायवा आणि टिप्पर पोलीस प्रशासनाच्या संगनमताने भरधाव वेगाने धावत असतात. वारंवार तक्रारी करूनही त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?
अपघातानंतर मुदखेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. बातमी लिहेपर्यंत पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र मोठा प्रश्न असा आहे की, प्रशासन या ‘मृत्यूच्या व्यापार्यांना’ अजून किती दिवस मोकळीक देणार? आणखी एका निष्पाप जीवाच्या बळीची वाट पाहिल्यानंतरच अधिकारी जागे होणार का?

COMMENTS