एका कवीच्या भावविश्वाचा 'तृष्णाकाठ' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
'तृष्णाकाठ' हा कवी वैभव देशमुख यांचा पहिलाच कवितासंग्रह असला, तरी कवीचे कवितेशी सखोल सख्य जुळलेले आहे. एका कवितेत कवीने लिहिले आहे : 'मी भोगतो कवितेला नखशिखान्त, म्हणून तिच्या अंगावरचे तीळ सांगू शकतो'. (तृष्णाकाठ, ४४) कवितेच्या देहावरचे बारीकसारीक तीळ सांगण्याइतका प्रगाढ आत्मविश्वास…