माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती नांदेड प्रतिनिधी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य प्रणव शास्...
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
नांदेड प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य प्रणव शास्त्री धानोरकर यांची नांदेड शहरातील विवेकनगर भागातील मारुती मंदिरात श्रीराम कथा सुरू आहे.
या श्रीराम कथेला मोठा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, ओमप्रकाश पोकर्णा, प्रसिद्ध कीर्तनकार प्रवीण दिवाकर, हभप विक्रम महाराज नांदेडकर, शिक्षक संघाचे पांडुरंग बच्चेवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे.
परमपूज्य गोविंददेव गिरीजी महाराज यांचे कृपांकित शिष्य प्रणव शास्ञी धानोरकर हे आपल्या अमृतवाणीतून समाज प्रबोधन करीत आहेत.

COMMENTS