नांदेड - मार्च महिन्यास सुरुवात झालेली असून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या...
नांदेड - मार्च महिन्यास सुरुवात झालेली असून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हीत लक्षात घेऊन जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या वेळेत बदल करून शाळा सकाळ सत्रात भरण्याविषयी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, मुख्याध्यापक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संजय शिप्परकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार, उपाध्यक्ष आनंद मोरे, सहसचिव आर पी वाघमारे, क्लायमेट अलाडा, आतनुरकर यांच्यासह मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.

COMMENTS