प्रतिनिधी- महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षक आयपिएस जी श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार घेताच सिंघम स्टाईलने कर्तव्य बजावण्यास सुरूवात केली असुन पदभार घेताच अवैध धंदे व गुन्हेगारी खपवून घेणार नसल्याचा ईशारा ठाणेदारांना देऊन जिल्ह्यातील 3 आरोपींना दोन वर्षासाठी तडीपार करून गुन्हेगारांना सावधानतेचा ईशारा दिला आहे. आयपीएस जी श्रीधर यांनी बिड येथे पोलिस अधीक्षक असतांना गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण केला होता. तर कर्तव्य पार पाडतांना अनेक गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले. अकोला येथे पोलिस अधीक्षक असतांना आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात 78 गुन्हेगारांना एनपिडीए,मोका अंतर्गत कारवाया करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक श्रीधर यांनी गुन्हेगारी संपुष्टात आनण्यासाठी आठवड्यातील चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये सराईत रेकार्ड वरील गुन्हेगारांची तपासणी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शूक्रवारी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीत उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 6 आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालया समोर हाजर केले आहे. जिल्ह्यातील सर्व ठाण्याचे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई चे सत्र सुरू असुन विशेष पथकाकडून एखादी मोठी कारवाई करण्यात आल्यास संबंधित ठाण्यातील जमादार व ठाणेदार यांच्या वर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे. पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या कार्यपद्धती ने सर्वच ठाणेदारांचे धाबे दणाणले असून येरवी दहा वाजता ठाण्यात येणारे ठाणेदार सकाळी सात वाजताच ठाण्यात हजर होऊन रात्री उशिरापर्यंत ठाण्यात थांबुन काम करतांना दिसत आहेत. पोलिस अधीक्षक श्रीधर यांच्या कडक स्वभावामुळे जिल्ह्यातील बहुतांश अवैध धंदे चालकाने आपले धंदे बंद केले आहेत. तर चोरी छुपे अवैध धंदे चालवणारे वर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाकडून कारवाया करण्यात येत आहेत.

COMMENTS