नांदेड -नांदेड येथील टाइनी एंजल्स हायस्कूल मधील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी कुमारी अवनी शंकर इंदुरकर हिने पर्यावरणातील पॉलिथिन चे प्रमाण कमी करण्यासाठी एक उपाय केला तिने परिसरातील टाकून दिलेल्या पॉलिथिन म्हणजेच कॅरीबॅग आणि चिप्स रॅपर यांचा संचय केला आणि त्यापासून सार्वजनिक ठिकाणी जसे मंदिर रेल्वे स्टेशन उद्याने येथे असलेल्या सिमेंट किंवा लोखंडी बेंचवर कॅरीबॅग पासून तयार केलेली गादी म्हणून त्याचा वापर केला.
या मागचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणात येणाऱ्या प्लास्टिकचा अतिरेक थांबवणे व त्या प्लास्टिकचा पुनर्वापर कशा पद्धतीने करता येईल आणि पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण कसे करता येईल याबद्दल तिने उपाय केला आहे.
या पार्श्वभूमीवर अवनीने मंदिर,शाळा याठिकाणी प्लास्टिकच्या वापराबाबत जागरूकता मोहीम राबवली आणि नागरिकांना जागरूक केले. या तिच्या कार्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

COMMENTS