नांदेड: महापालिका अर्थसंकल्पातील दिव्यांगांसाठीचा राखीव ५% निधी ३१ मार्चपूर्वी खर्च न झाल्यास आयुक्त आणि महापौरांना घेराव घालण्याचा इशारा ...
नांदेड: महापालिका अर्थसंकल्पातील दिव्यांगांसाठीचा राखीव ५% निधी ३१ मार्चपूर्वी खर्च न झाल्यास आयुक्त आणि महापौरांना घेराव घालण्याचा इशारा 'बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती'ने दिला आहे.
समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज महापालिका प्रशासनाला निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम २०१६ नुसार ५% निधी खर्च करणे बंधनकारक असतानाही नांदेड महापालिकेने अद्याप ठोस कार्यवाही केलेली नाही. आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक असल्याने, हा निधी तात्काळ पुनर्वसन, शैक्षणिक सहाय्य आणि साधनसामग्रीसाठी खर्च करावा. यापुढे निवेदन न देता थेट तीव्र आंदोलन केले जाईल आणि त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.

COMMENTS