मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पातून अवैधरीच्या चालू असलेल्या काळ्या मातीची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असून यातच दि...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पातून अवैधरीच्या चालू असलेल्या काळ्या मातीची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असून यातच दि.16 रोजी दुपारी काळ्या मातीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने मोटार सायकल स्वारस धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून हजाराच्या वर टिप्परने लेंडी प्रकल्पाच्या बाधित शेतीतून बिहारीपुर, डोरनाळी, ईडग्याल , रावणगाव येथील शेतीतून काळी माती काढून बाराहाळी मुखेड उदगीर कर्नाटकातील औराद हंगरगा भंगार कुमठा आधी गावामध्ये तस्करी करण्यात येत आहे.यातच दिनांक 16 रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास बिहारीपुर ते बाराहाळी रोडवर निवळी गावाजवळ एका काळ्या मातीने भरलेल्या टिप्पर क्रमांक MH24 AB8880 च्या चालकांनी मोटार सायकल क्र MH26 CX1384 या क्रमांकाच्या मोटार सायकल ला धडक दिली. यातच मोटार सायकल स्वार संतोष कांबळे राहणार भेंडेगाव वय 30 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. मुक्रमाबाद पोलिसांना घटनेची माहिती समजताच एपीआय राजेश चव्हाण व पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ पोहोचले .
गेल्या दोन महिन्यापासून या भागात मोठ्या प्रमाणात टिप्पर रात्रंदिवस काळ्या मातीची अवैध वाहतूक करत असून त्याकडे काही सामाजिक कार्यकर्त्याकडून या वाहनधारकावर कारवाई करण्यासाठी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आले. पण काळ्या मातीची वाहतूक रोखण्यासाठी शासनाचे कोणतेही नियम लागू पडत नसल्याचे सांगण्यात आले. यातच यापैकी काही टिप्पर च्या समोर काचावर महाराष्ट्र शासन, हवलदार असे फलक लावून अवैध वाहतूक करताना दिसून येत आहेत. बिहारीपुर ते बारहाळी या रस्त्यावरील निवळी गावाजवळ पावसाळ्यामध्ये पुल तुटल्यामुळे गेल्या 4 महिन्यापासून जड वाहनांना वाहतूक बंद करण्याचे आदेश प्रशासन तहसीलदार मुखेड व पोलीस स्टेशनला मुक्रमाबाद याच्या कडून देण्यात आले होते. तेव्हा पासून सदरील रस्ता हा वाहतुकीसाठी बंद असूनही यावरून अवजड काळ्या मातीची वाहतूक सर्रास चालूच होती. यातच या रस्त्यावर अवजड वाहनामुळे जीव गेला जिल्हा परिवहन कार्यालयाचे मुक्रमाबाद परिसराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अवैध रित्या अवजड वाहनात काळ्या मातीची वाहतूक चालू आहे. या तुटक्या पुलावरून मात्र विद्यार्थ्यासाठी चालू असलेली महामंडळाची एसटी बस सेवा अवजड वाहनाच्या कारणाने बंद करण्यात आली आहे. एसटी बस पेक्षा जास्त वजनाच्या वाहनातून चालू झालेल्या या वाहतुकीचा पहिला बळी गेला आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का ? असेच गरीब नागरिकांचे बळी जातील हे हे तर आता प्रशासनच ठरवेल...

COMMENTS