*
सेलू. (. ) : भारतीय टेनिसव्हॉलीबॉल खेळास केंद्रीय सुविधा व खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत समाविष्ट व्हावा, या उद्देशाने बुधवारी श्रीराम जन्म भूमी न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांना टेनिस व्हॉलीबॉल खेळा संदर्भात बुधवारी (१९ ऑक्टोबर) वालूर येथे माहिती पुस्तिका देण्यात आली. यावेळी स्वामीजींनी खेळाच्या मान्यतेसाठी शुभाशीर्वाद दिले. उद्योजक सुरेंद्र तोष्णीवाल, राज्य चिटणीस गणेश माळवे, प्रा.नागेश कान्हेकर, बाबासाहेब हेलसकर, गंगाधर कान्हेकर , शिवम सारस्वत महाराज यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेक इन इंडियाच्या धर्तीवर भारतीय टेनिस व्हॉलीबॉल या खेळांची निर्मिती पुणे (महाराष्ट्र) येथील डॉ.व्यंकटेश वांगवाड यांनी केली आहे. आजपर्यंत टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या २४ राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत; तसेच आंतरराष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन होत आहे. देशातील खेळाला केंद्रीय सुविधा मिळाली, तर देशी खेळास संपूर्ण जगात पोहचण्यासाठी मदत होईल. या खेळाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य संघटनांचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्यात पुणे येथे आहे. भारतीय खेळाडूंना या खेळाचा फायदा व्हावा. त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, भारत देशाचा झेंडा आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जगात पोहचण्यासाठी मदत होईल. जसे महाराष्ट्रीयन कबड्डी, खो-खो, मल्लखांब या खेळास आश्रयदाते मिळाले म्हणून, हे खेळ आज प्रसिद्ध होऊन खेळाडूंचे फायदे होत आहेत. याच पध्दतीने टेनिस व्हॉलीबॉल खेळास आशीर्वाद व मार्गदर्शनातून आश्रय मिळेल, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली.
पुर्ण.....
.

COMMENTS