प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
प्रत्येक विभागात प्रशासकिय अधिकारी मग आयएएस असो की आयपिएस, किंवा राज्यसेवेतुन अधिकारी झालेला असो, तो आपल्या कामातुन संबंधीत विभागात आपली छाप सोडत असतो. मग कुणी पारदर्शक कारभारातुन तर कुणी आपल्या कडक स्वभावातुन आठवण सोडून जातो. याचेच एक उदाहरण म्हणजे आपले हिंगोली जिल्हा पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर होय. आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आतापर्यंतच्या कामगिरीतुन हिंगोलीकरांची मने जिंकली.हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर निवेदन, तक्रार मांडण्यासाठी आलेले प्रत्येक सर्वसामान्यांची त्यांनी दखल घेऊन जातीने लक्ष देऊन ती सोडवली. प्रत्येकांच्या तक्रारी अडीअडचणी सोडवणारे एसपी कलासागर म्हणुन त्यांची जिल्हा भरात ओळख निर्माण झाली आहे. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार घेतला तेंव्हा पासुन हिंगोली जिल्ह्यात जबरी चोरी, मोटरसायकल चोरी, अवैध गुटखा, गांज्या, धान्याचा काळाबाजार आदीवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या.गंभीर गुन्हयातील आरोपींना कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसात बेड्या ठोकण्यात आल्या.अनेक गंभीर गुन्हे चा तपास साहेबांच्या काळात लागला. यामध्ये त्यांना ईतर कर्तबगार सहकारी अधिकारी यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय सह सर्वच ठाणेदार यांचे सहकार्य लाभले. कलासागर यांनी त्यांच्या संकल्पनेतुन पोलिस दलात विविध उपक्रम राबविले यामध्ये एक "कँमेरा माझ्या शहरासाठी", जननी महिला सुरक्षा जनजागृती अभियान, नागरी सुविधा केंद्र, डायल 112 ची प्रभावी पणे अमलबजावणी, रस्ता सुरक्षा अभियान, भरोसा सेल, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या साठी आरोग्य शिबीर, आदी विविध उपक्रम त्यांनी प्रभावी पणे राबविले. कलासागर यांच्या कार्यकाळात गणेशोत्सव, दुर्गाउत्सव विविध धर्मीयांचे सण उत्सव शांततेत साजरे झाले. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे बदल्या कुणावर ही अन्याय होणार नाही. प्रतेकाने दिलेल्या पर्यायानुसार अडचण समजुन पारदर्शक बदल्यांची प्रक्रिया पार पाडत दोन दिवसापुर्वी पोलिस दलातील 174 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून कर्मचाऱ्यांची मने जिंकली. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी आपल्या पारदर्शक कारभारातुन प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या ईतर अधिकार्यांसमोर आनोखा आदर्श ठेवला. आज त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांची बदली झाली.
दीवाळी निमित्ताने आदर्श व्यकतीमत्व आसणारे राकेश कलासागर सर यांना व त्यांच्या परिवाराला शुभेच्छा..

COMMENTS