किनवट: तालुक्यातील गोकुंदा येथे नियमांची पायमल्ली करून अनधिकृतपणे सुरू असलेल्या शांतीनिकेतन इंग्लिश पब्लिक स्कूलवर शिक्षण विभागाने दणकेबाज क...
किनवट: तालुक्यातील गोकुंदा येथे नियमांची पायमल्ली करून अनधिकृतपणे सुरू असलेल्या शांतीनिकेतन इंग्लिश पब्लिक स्कूलवर शिक्षण विभागाने दणकेबाज कारवाई केली आहे. स्थलांतराची कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या या शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे जाहीर आवाहन प्रशासनाने केले असून शाळेच्या प्रवेशद्वारावरच तसे फलक (जाहीर प्रगटन) लावले आहेत.
युवासेनेच्या तक्रारीनंतर कारवाईचा बडगा
या गैरप्रकाराबाबत युवासेना किनवट-माहूर विधानसभा प्रमुख दयाभाऊ पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत, जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षणाधिकारी (प्रा.) वंदना फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले.
प्रशासनाचा 'अल्टिमेटम' आणि यूडायस नंबरवर टांगती तलवार
विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या पथकाने शाळेच्या प्रवेशद्वारावर जाहीर प्रगटन लावून पालकांना सावध केले आहे. प्रशासनाने शाळेला खालीलप्रमाणे कडक इशारा दिला आहे:
स्थलांतर अनिवार्य: तीन दिवसांच्या आत ही शाळा मूळ मान्यता असलेल्या ठिकाणाहून (कोठारी-चिखली) सुरू करावी.
निलंबनाची कारवाई: मुदतीत शाळा सुरू न केल्यास शाळेचा यूडायस (UDISE) क्रमांक निलंबित केला जाईल.
दंडात्मक कारवाई: शिक्षण अधिकार अधिनियम २००९ (RTE) नुसार शाळेवर कठोर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
प्रशासनाचा संदेश: "पालकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. ही शाळा सध्या गोकुंदा येथे अनधिकृतपणे सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी येथे प्रवेश घेऊ नये."
ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल मराठवाडा
नेमका प्रकार काय?
रयत प्रतिष्ठान, गवंडगाव तांडा (ता. देगलूर) या संस्थेला मौजे कोठारी (चिखली) येथे इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करण्याची शासन मान्यता मिळाली होती. मात्र, संस्थेने कोठारी येथे शाळा सुरू न करता, नियमबाह्य पद्धतीने ती गोकुंदा येथे स्थलांतरित केली. शासनाकडून स्थलांतराची कोणतीही रीतसर परवानगी न घेता ही शाळा अनधिकृतपणे चालवली जात होती.युवासेनेच्या तक्रारीनंतर कारवाईचा बडगा

COMMENTS