दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक सोमनाथ वासकर, नगरसेविका कोमल सोमनाथ वासकर यांच्या वतीने सानपाडा विभाग ज्यांच्या कार्यतत्परतेमुळे सुरक्षित आणि संरक्षित आहे असे पोलीस कर्मचारी, अधिकारी, स्वच्छता कामगार, मल्लनिसरण कामगार, पाणीपुरवठा कामगार, रस्ते दिवाबत्ती देखभाल दुरुस्ती कामगार, स्मशान भूमी कामगार, गॅस पुरवठा कामगार, आरोग्य कर्मचारी, शाळा बहुउद्देशीय कामगार, एमएसईबी कामगार, उद्यान माळी, आणि लिफ्ट कामगार अशा सामाजिक सेवेत कार्यरत असलेल्या सर्व कामगारांना दिवाळीनिमित्त जिल्हाप्रमुख श्री. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी नेहमीच गरिबांची सेवा करणारे, सर्वसामान्यांच्या संकटाला धावून जाणारे, दुसऱ्यांना आनंद देणारे नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या कार्याचा गुणगौरव करून यापुढे त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो, अशा दिवाळीनिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या. नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी सानपाडा मधील रहिवाशांना नेहमीच सेवा देणारे, नवी मुंबई महानगरपालिकेचे कामगार केव्हाही हाक मारले की धावून येतात आणि येथील रहिवाशांची सेवा करतात, त्यामुळे आम्ही दरवर्षी या कामगारांना दिवाळी फराळ वाटप करतो. आम्ही नेहमी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करतो. सर्व रहिवाशांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. याप्रसंगी शिवसेनेच्या नगरसेविका कोमल वासकर, शिवसेना विभाग प्रमुख आशिष वास्कर, शाखाप्रमुख रणधीर सुर्वे, प्रल्हाद गायकवाड, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, खजिनदार विष्णुदास मुखेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव ज्ञानेश्वर जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे चव्हाण, काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS