मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागतील वरिष्ठ सहाय्यक गोदी प्रबंधक श्री. संजीव शृंगारपुरे हे ३१ मार्च २०२२ रोजी ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोर्ट ट्रस्टमधून सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने गोदी विभागातील इनडोअर व आऊटडोअर कर्मचाऱ्यांतर्फे २९ मार्च २०२२ रोजी इंदिरा गोदीत हमालेज बिल्डिंग, पहिला माळा येथे मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ उपगोदी प्रबंधक श्री. आर. एन. शेख यांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ, फेटा व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
संजीव शृंगारपुरे यांचा स्वभाव मनमिळाऊ, प्रेमळ व सहकार्याचा असल्यामुळे त्यांच्या सत्कार सोहळ्यास अधिकारी, कामगार, युनियन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात कामगारांना चांगले सहकार्य करून पोर्ट ट्रस्टमध्ये अनेक विधायक कार्य केली. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव बबन मेटे, खजिनदार कल्पना देसाई, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ उपसचिव शेनॉय, मुख्य सुरक्षा अधिकारी देशमुख, वरिष्ठ उप कल्याण अधिकारी व जनसंपर्क अधिकारी रफिक कुरेशी, वरिष्ठ उपगोदी प्रबंधक आर. एन. शेख, शेनगर, तिवारी, एस. व्ही. प्रकाश, संजीव कुमार, वरिष्ठ सहाय्यक गोदी प्रबंधक राऊत, इथापे, मुळीक, टाईम किपर बबन हडवळे आदी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. या सत्कार सोहळ्यास मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, उपाध्यक्ष निसार युनुस, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष संजय माधव, गोदी विभागातील अधिकारी आर.जे.सावंत, स्वामी, यादव, झरकर, शैलेश चव्हाण, डेल्फिन कोलासो, हंसराज सावंत, सिद्धेश शिगवण, गजभिये, कटारनवरे, जाधव, दळवी, केवट आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन गजेंद्र हिरे व अंबिके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक खताळ ए.आर.इ.पटेल, अशोक राऊत, संदीप घागरे, अशोक वाळुंज, थळकर, विजय गुरव, आनंद एकावडे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धी प्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS