औरंगाबाद पदविधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याला दोन वर्षात दिले केवळ २० लाख.....!                                        

    औरंगाबाद नंतर मतदासंघात सर्वात मोठ्या असलेल्या नांदेड जिल्ह्याकडे दुर्लक्ष " -------------- नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )   पदवीधरांचे...


 


 


औरंगाबाद नंतर मतदासंघात सर्वात मोठ्या असलेल्या नांदेड जिल्ह्याकडे दुर्लक्ष "


--------------


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


पदवीधरांचे काय प्रश्न असतात हा वेगळा विषय असला तरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षात नांदेड जिल्ह्याला फक्त २० लाखांचा निधी दिल्याचे समोर आले आहे . निवडणुका जवळ आल्या की मतदारांना आकर्षित करण्यासाठी आमदार खुल्या हाताने निधी देतात . परंतु , चव्हाण यांनी मागच्या दोन वर्षात १४ व ६ लाख असा निधी दिला आहे . आठ जिल्हे विस्तारलेला हा मतदारसंघ असल्याने प्रत्येक जिल्ह्याला निधी द्यावा लागतो . हे खरे असले तरी सुरूवातीचे दोन वर्ष चांगला निधी मिळाल्यानंतर चव्हाणांकडून निधीचा ओघ कमी झाल्याचे दिसते . पदवीधरांचे वेगवेगळे प्रश्न असतात , हे प्रश्न निकाली काढण्यात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे पारंगत असतील म्हणूनच पदवीधर त्यांना निवडून देत असतील असे मानले तरी हा भाग वेगळा ठेवून त्यांनी मागच्या दोन वर्षात नांदेड जिल्ह्याला दिलेल्या निधीचे ' ऑडीट ' केल्यास निश्चितच ते समाधानकारक नाही . दरम्यान , निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक आमदार मागणी असेल त्या भागाला भरभरून निधी देत असतात . ही उदाहरणे समोर असताना चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यासाठी हात आखडता का घेतला , अशी चर्चा होत आहे . औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सुरुवातीला २०१५-१६ या वर्षात नांदेडला ३२ लाख ७५ हजार , २०१६-१७ मध्ये २२ लाख २० हजार आणि २०१७-१८ मध्ये ३१ लाख रूपये एवढा विकासनिधी दिला होता . पदवीधर मतदारसंघात आठ जिल्ह्याचा समावेश असल्याने 


उपलब्ध निधीची समान वाटणी त्यांनी केली असे मानले तरी ही नंतरच्या दोन वर्षात २०१८-१९ मध्ये १४ लाख ८५ हजार , २०१९ -२० मध्ये केवळ ६ लाख ८३ हजाराचा विकास निधी त्यांनी नांदेड जिल्ह्यात खर्ची घातला आहे . या आकडेवारीनुसार आ.सतीश चव्हाण यांनी सहा वर्षाच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्याला १ कोटी ७ लाख रूपये विकास निधी दिल्याचे दिसून येत असले तरी शेवटच्या दोन वर्षात त्यांनी आखडता हात घेतल्याने त्यांची चर्चा होत आहे.


 औरंगाबाद नंतर मतदासंघात सर्वात मोठ्या असलेल्या नांदेड जिल्ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष करण्यामागे काय ? कारण असेल याचिही चर्चा नांदेड जिल्ह्यात सद्या जोमात चालू आहे...


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group