दिवाळी काळात जनतेनी जागृतता बाळगावी, स.पो.नि.सोमनाथ शिंदे यांचे आवाहन
====================
नायगाव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
..............................
रामतीर्थ पोलीस स्टेशन तर्फे हद्दीतील जनतेला दिवाळी व दिवाळी सुट्याच्या पार्श्वभूमीवर स.पो.नि. सोमनाथ शिंदे यांनी जनतेनी जागरूकता बाळगावी असे आवाहन पत्रकाद्वारे व सोशियल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
सध्या दीपावलीचा सण सुरू आहे. त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे,किंवा दागिने ठेऊन जाऊ नये ,दिपावली किंवा लग्न समारंभा करिता बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तु, पैसे बँकेत ठेवावे किंवा सोबत घेऊन जावे, आपण बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना तसेच पोलीसांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी असेही आव्हान करीत,सपोनी शिंदे पुढे म्हणाले की,
बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये,प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ पिऊ नयेत आपण जागरुकता बाळगणे का महत्त्वाचे ठरते तर त्यामध्ये गुंगीचे औषध असू शकते, प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावधानता बाळगावी गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे.
*विशेषतः व्यापारी, दुकानदार, सराफा यांनीही याकाळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षा ठेवावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, बंद पडले असतील तर दुरुस्त करून घ्यावे ग्राहकांनी बाजारामध्ये खरेदी करताना मोबाईल किंवा पैसे वरच्या खिशात ठेऊ नये तसेच आपली गाडी व्यवस्थीत ठिकाणी पार्क करून हँडल लॉक करून ठेवावी,
ऑनलाईन फ्रॉडच्या आमिषाला बळी पडू नये.परिसरामध्ये किंवा आपल्या कॉलनी मध्ये काही संशयीत हालचाली, संशयीत इसम किंवा काही अनुचित प्रकार आढळल्यास त्यावर त्वरित पोलीस स्टेशन रामतीर्थ 02465-267101शी संपर्क साधावा असेही आवाहन रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या वतीने सपोनी सोमनाथ शिंदे यांनी केले आहे.
COMMENTS