मस्साजोग ( प्रतिनिधी ) बीड जिल्हयातील प्रसिद्ध वृतपत्रलेखक शेख सिराज यांनी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या लिखित, ध्वनीमुद्रीत,चलचित्र व थेट प्रक्षेपण सादरीकरण स्वरुपात साजऱ्या झालेल्या अभूतपूर्व सोहळ्यात उत्कृस्ट लेख .करीता छंदोगा मात्य संमेलन साहित्यविस्कार मानकारी ठरल्या बद्दल शेख सिराज यांना छदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान गौरव गीतकार श्री. अमरदीप पंढरीनाथ मखामले , अभिनेता , दिग्दर्शक , निर्माता श्री. अमर भारत देवकर , अभिनेता श्री. गणेश प्रभाकर मयेकर, नाटककार श्री. जगदीश अनंत संसारे , साहित्यिक विजयमाला संजय जोशी आदि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शेख सिराज यांनी महाराष्ट्रातील विविध दैनिकातून विविध लेखन केलेले आहे. त्यांना यापूर्वी साहित्य लेखन कार्या बद्दल असंख्य पुस्काराने सन्मानित करण्यात आले. शेख सिराज यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, मिञपरिवार, शिक्षक मित्र परिवार , पत्रकार मित्र परिवार आदिनी विशेष आभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
COMMENTS