. राम दातीर
माहूर (प्रतिनिधी ) माहूर- किनवट महामार्गावर नखेगाव फाटया जवळ एस.टी. बसने सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहकासह 19 प्रवासी जखमी झाले आहेत.सर्व जखमींना उपचाराकरिता तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज दि.11नोव्हें.रोजी स.11-45 वा. माहूर पासून 5 किमी अंतरावरील नखेगाव फाटया जवळ किनवट- औरंगाबाद एस.टी. बस( क्र. एमएच २० बीएल ३१३४)ने समोरील ट्रकला ( क्र.टिएस ०१ युएल १७९९) पाठीमागून धडक दिल्याने बसच्या पुढील दोन्ही काचा फुटल्या आहेत.
जखमीवर वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन. भोसले, डॉ. अभिजीत अंबेकर यांनी उपचार केले. आगारप्रमुख व्ही.टी. धुतमल,स्थानक प्रमुख व्ही.एन. जावळे, प्रविण पाईकराव, डि.एस. कोकणे, देशमुख, करपे, प्रभारक आर.जी.पाटील यांनी भेट देऊन जखमी प्रवाशांना प्रत्येकी पाचशे रुपयाची आर्थीक मदत दिली.
अपघातात वाहकासह एकूण 19 प्रवासी जखमी झाले आहेत. एका गरोदर महीलेवर उपचार सुरू असून बाकी जखमीवर प्राथमिक इलाज केल्या नंतर त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती डॉ.भोसले यांनी दिली.धूळीमुळे वाहन न दिसल्याने सदर अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
COMMENTS