नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
8 नोव्हेंबर 2020 रोज रविवारी दुपारी 12 वाजता स्वाभीमानी कुंभार समाज संघटनेच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ कोलमकर प्रमुख पाहुणे जिल्हाअध्यक्ष श्री विजयराव देवडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नायगाव तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्व श्री. डाॅ.प्रा. गणेशराव देवडे सर
ब्लु बेल्स शाळेचे संस्थापक हरिबाबुसर ,एच.आर.अकॅडमी नांदेड मधील प्रा.हासेवाडसर नायगाव तालुक्याचे महिला व बालविकास अधिकारी श्री राजुरे. एल. यम, जिल्हासचिव श्री शिवाजीराव पांगरीकर, जिल्हा कोअर कमिटीचे युवाध्यक्ष श्री बालाजी घुमलवाड,प्रल्हाद यनगंटे साहेब , शंकरराव नांदेडकर विठ्ठलराव बोमलवाडसर गणेशराव नायगावकर , डी.वाय. मरकंटेसर ,बाबुराव देवडेसर शंकरराव कुर्णापल्लेसर , श्रीहरी मरवाळीकर,राजेश नायगावकर,गंगाधर कानगुलेसर सोपान कानगुलेसर ,पार्डीकर ताई व कानगुलेताई तर तालुक्यातील
समाज बांधव उपस्थित होते यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पुष्पहार घालुन त्यांचा गौरव करण्यात आला .यावेळी दहावी बारावी व इतर
विध्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून व सॅनिटाझर वापर करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ता.अध्यक्ष शिवाजीराव राजुरकर साहेब सूत्रसंचालन श्री .विठ्ठल कोकलेगावकर यांनी केले तर श्री विलास कानगुलेसर यांनी आभार मानले.
COMMENTS