राम दातीर माहूर (प्रतिनिधी )राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे वतीने राज्यस्तरावर ' माझी वसुंधरा अभियान राबविण...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे वतीने राज्यस्तरावर ' माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येणार आहे.त्यानिमित्त माहूर नगर पंचायत मध्ये आज दि.11 नोव्हें.रोजी दु.1 वा.शपथ सोहळा संपन्न झाला.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांशी निगडीत जीवनशैलीचा स्विकार करून शाश्वत व निसर्गपूरक जीवन पध्दती अंगिकारण्यासाठी 'माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी उपस्थितांना शपथ दिली.यावेळी सुनील वाघ,गंगाधर दळवे,देवीदास जोंधळे,विशाल ढोरे,देवीदास सिडाम,भाग्यश्री रासवते,विजय शिंदे,शेख मजहर,सुरेंद्र पांडे,गणेश जाधव,नईम पाशा,पुष्परेखा दवणे,सूलोचना भगत,वच्छलाबाई रणबावळे यांचेसह पत्रकार व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS