नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
ग्रामीण भागाच्या विकासाचा दुवा समजला जाणारा ग्रामसेवक हा अधिकारी यात मुख्य भूमिका बजावतो आणि ग्रामस्थांना येणाऱ्या समस्या या मध्ये मूलभूत गरजा पाणी, आरोग्य, रास्त योजनांचा विकास या सर्वांची जबाबदारी ही ग्रामसेवकावर अवलंबून आहे.
मात्र नायगांव तालुक्यातील ग्रामसेवकांच्या विरुद्धत रोजच काही न काही तक्रारी प्राप्त होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवकाच्या गैरहजेरीची तक्रारी जास्त आहेत, तसेच ग्रामसेवकाने सरपंचाला हाताशी धरून निघालेली कामे स्वतः घ्यायची व ती थातुरमातुर पद्धतींनी पूर्ण करून शासनाचा पैसे गिळंकृत करायच, रोजगार सेवकाचे मानधानची रक्कम त्याच्या खात्यात न जमा करता परस्पर रोखीने काढून अपहार करायचे अश्या विविध समस्या घेऊन येथील गरीब ग्रामस्थ बांधव नेहमीच गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात, परंतु त्यांना तेथे दाद मिळत नाही , याला कारणीभूत म्हणजे ग्रामसेवकांची मनमानी व वरिष्ठांचे वरदहस्त आणि अर्थकारण, त्यामुळे कोणी कितीही बोंबा बोंब करा आमचे कोणी वाकडे करू शकणार नाही या भ्रमात येथील ग्रामसेवक वावरत आहे.
गडगा येथील ग्रामसेवकांच्या मुजोरी मुळे निकृष्ट कामे व विकास पूर्णपणे खुंटलेला दिसत आहेत. काही ग्रामसेवक कार्यालयात हजरही राहत नाहीत त्यामुळे बहुतेकदा ग्रामस्थांचे कामे रखडून त्यांना नाहक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कोणत्याही ग्रामसेवकांना फोन लावा लागणार नाहीच, कारण प्रत्येक ग्रामसेवकांकडे तीन चार मोबाईल नंबर असतात, ठराविक माणसाला वेगळा नंबर तर अन्य नागरिकांना वेगळा नंबर ही अवस्था आहे गडगा ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगात याही पुर्वी जवळपास चाळीस लाखाहून अधिक भ्रष्टाचार उघडकीस आला आहे मात्र कार्यवाही साठी वरीष्ठ अधिकार्यांची लेखनी अर्थकारनाने कमी पडल्यामुळे नवीन भ्रष्टाचाराला नुकताच वाव मिळाला असून सरपंच आणि पठाण ग्रामसेवक यांनी मिळून दोन लाख शहाण्णव हजार रुपये कुठलेही कवडीचे काम न करता पुर्ण पने निधी हडप केला आहे.असे निवेदनात बंडेवाड यांनि म्हटले आहे. तसेच तालुक्यातील विविध संघटना मार्फत ग्रामस्थांच्या समस्येला दाद मिळत नाही म्हणून व त्या लवकर दूर व्हाव्यात म्हणून आंदोलनेही करावी लागतात या दरम्यान संबंधित अधिकारी म्हणून नेहमीच ग्रामसेवकांची गरज भासत आहे. मात्र या मोर्च्याच्यां वेळी आंदोलनाच्या वेळी वरिष्ठ कार्यालयात नेहमीच ग्रामसेवकांची गैरहजेरी असते, कुठल्या तोंडाने उभे राहणार या सर्व समस्या आपल्यामुळेच उभ्या झालेल्या असतात, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काय उत्तर देणार, त्यामुळे जाणून बुजून हे ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत.
ग्रामसेवकांवर नियंत्रण अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी व तहसीलदार मुख्य भूमिका बजावत आहेत. मात्र अर्थ कारणामुळे आजतागायत अश्या एकही ग्रामसेवकांवर कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तालुक्यातील विविध योजनांत येथे निकृष्ट कामे व विविध योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात तेथील ग्रामसेवक हेच जबाबदार असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र आजतागायत या कोणत्याही ग्रामसेवकांवर कारवाई होत नाही. तसेच त्यांचे पाठीराखे कोण? असाही प्रश्न निर्माण होत आहे.विनंती आणि तक्रारी करण्याची क्षमता जनतेमध्ये राहिली नाही.
गडगा येथील प्रकरणाची सखोल चौकशी करुन यामध्ये सरपंचासह ग्रामसेवक पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.
अन्यथा उपोषणाला बसण्याचाही ईशारा सामाजिक कार्यकर्ते भानुदास बंडेवाड यांनी दिला आहे..
COMMENTS