नांदेड, दि. २ जुलै : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत ०८७ नांदेड विधानसभा मतदारसंघातील चौफाळा भागास आज तहसीलदार तथा सहाय्यक मतदार...
नांदेड, दि. २ जुलै : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत ०८७ नांदेड विधानसभा मतदारसंघातील चौफाळा भागास आज तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.यावेळी संबंधित भागातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री. शेख, पर्यवेक्षक तसेच सुमारे ४० बीएलओ व सहाय्यक बीएलओ यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम अचूक, पारदर्शक व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणना फॉर्मचे वाटप, संकलन तसेच प्राप्त फॉर्मचे ॲपवर तात्काळ डिजिटायझेशन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच कामाचा आढावाही घेण्यात आला.बैठकीनंतर तहसीलदार संजय वारकड यांनी चौफाळा येथील बालाजी कोकलवार यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष गणना फॉर्म भरून घेतला. त्यानंतर त्याचे त्वरित ॲपवर डिजिटायझेशन करून उपस्थित बीएलओ व सहाय्यक बीएलओ यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.यावेळी बीएलओ मिनाक्षी शहा, पर्यवेक्षक विलास शृंगारपुतळे तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपअभियंता, विष्णुपुरी प्रकल्प श्री. शेख गुलाम उपस्थित होते.विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंदणी व माहितीचे वेळेत डिजिटायझेशन करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले

COMMENTS