उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्य कचरा व्यवस्थापन ही आजच्या काळाची नितांत गरज बनली आहे.
निडेबन ग्रामपंचायत अंतर्गत डम्पिंग ग्राउंड (कचऱ्याची विल्हेवाट) व्यवस्था नसल्यामुळे बरेच वर्ष झाले,येथील नागरिक ह्या गंभीर समस्याने त्रस्त होते.
रोड लगतच्या मोकळ्या जागेत कचरा नागरीक टाकत असल्यामुळे येथील नागरिकांचा जिव रोगराई च्या विळख्यात अडकत चालल्यामुळे हि बाब या परिसराचे सन्माननीय सदस्य डाँ दिपकजी संग्राम सोमवंशी साहेब यांच्या निदर्शनास आल्यानंतर कसलाच विलंब न करता समस्याचे निवारण करण्यासाठी निडेबन ग्रामपंचायत येथील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन डम्पिंग ग्राऊंड नसल्याबद्दल उदगीर नगर परिषदचे अध्यक्ष सौ. स्वातीताई सचिन हूडे , मुख्याधिकारी तसेच आरोग्य व स्वच्छता सभापती श्री.राजकुमार हुडगे यांच्याशी समन्वय साधून समस्यांचे निवारण केले.
याबद्दल निडेबन ग्रामस्थांकडून सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य डाँ दिपक संग्राम सोमवंशी साहेबाचे कौतुक करत आहेत.

COMMENTS