वाढदिवसाचे औचित्य साधून १५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे मोफत वाटप

मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध्यापक , आणि भव्याचे आई-वडील विशाल पाटील व स्वप्नजा पाटील यांनी आपल्या कुटुंबातील लाडक्या चिमुरडीच्या वाढदिवसावर होणारा विनाकारण खर्च टाळून समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचा एक अनोखा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. कु. भव्या विशाल पाटील हिच्या आगामी वाढदिवसाचे औचित्य साधून या पाटील व बिचकुंदे परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, आंबुलगा बु. येथील १५० गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
महिन्यापूर्वीच केला वाढदिवस साजरा
लाडकी भव्या हिचा जन्मदिवस हा वास्तवत: १९ जुलै रोजी असतो. मात्र, सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची तातडीने गरज आहे. ऐनवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि वेळेत त्यांना नवीन शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळावा, या अत्यंत संवेदनशील विचारातून या परिवाराने तब्बल एक महिना आधीच हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला
काका, शाळा समिती, शिक्षक वृंद व गावातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत वाटप -
सोमवारी दिनांक 22 रोजी सकाळी 10:30 वाजता शाळेच्या प्रांगणात आयोजित या संयुक्त उपक्रमाला भव्याचे काका श्री. निलकंठ पाटील, श्री. नागेश पाटील आणि श्री. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव देशटवाड, उपाध्यक्ष शिवाजी पांढरे पाटील व समितीचे सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मंडळी श्री. शिवाजी पाटील अंबुलगेकर, उपसरपंच शरद पाटील, शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर मामीलवाड , पोलिस पाटील विठ्ठल कौरवार यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांच्या आणि शिक्षकांच्या हस्ते लहानग्या विद्यार्थ्यांना आकर्षक शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हक्काची आणि सुंदर बॅग मिळाल्यामुळे उपस्थित 150 चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
शाळेतील शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांनी पाटील व बिचकुंदे परिवाराच्या या दातृत्वाचे आणि संवेदनशीलतेचे विशेष कौतुक केले. तसेच चिमुकल्या भव्याला भावी वाटचालीस व निरोगी आयुष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले. सामाजिक बांधिलकीचा हा पॅटर्न इतर सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.



COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group