माहूर(प्रतिनीधी)पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मानला जाणारा 'वटसावित्री पौर्णिमा' हा सन माहूर शहर व परिसरामध्ये अत्य...
माहूर(प्रतिनीधी)पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मानला जाणारा 'वटसावित्री पौर्णिमा' हा सन माहूर शहर व परिसरामध्ये अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. माहूर शहरातील मुख्य चौक, मंदिरांचे परिसर आणि ग्रामीण भागातील जुन्या वटवृक्षांच्या ठिकाणी महिलांनी सकाळपासूनच पूजेसाठी गर्दी केली होती. महिलांनी वटवृक्षाला हळद-कुंकू वाहून, अक्षता आणि ऋतूची मुख्य फळे ,नैवेद्य अर्पण केला. 'जन्मोजन्मी हाच पती लाभू दे' अशी प्रार्थना करत सुवासिनींनी वटवृक्षाला सुताचा दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या. पूजा संपन्न झाल्यानंतर महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावून, सुवासिक फुलांची ओटी भरली आणि पारंपरिक 'वाण' लुटून सणाचा आनंद द्विगुणित केला.यामुळे निर्माण झालेली चैतन्यमयी वातावरणामुळे संपूर्ण माहूर परिसर धार्मिक रंगात न्हाऊन निघाल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS