नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन २०२६ रोजी महापालिकेच्या विसावा उद्यान येथील आयोजित कार्यक्रमात “हरित नांदेड” अभियानास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विविध सामाजिक संस्था व वृक्षमित्र फाउंडेशनचे प्रतिनिधी सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मागील आठ वर्षापासुन लोकसहभागातुन वृक्ष लागवड संगोपनाचे कार्य सुरु असुन *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या संकल्पनेतुन “हरित नांदेड” उपक्रमा अंतर्गत २०२६ च्या मान्सुन मध्ये महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा हद्दीत एकुण १८००० वृक्ष लागवड करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दिनांक ५ जुन रोजी विसावा उद्यान येथे वृक्षरोपण करुन करण्यात आली आहे.

नांदेड शहराचे वाढलेले तापमान नियंत्रित करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था एकवटल्या असुन नियोजनबध्द कार्यक्रमातुन वृक्षांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासन, वृक्षमित्र फाउंडेशन, गुरुव्दारा लंबर साहेब व शहरातील विविध सामाजिक संस्था एकवटल्या आहेत.या सर्वांच्या पुढाकाराने व सहकार्याने हरित नांदेड हे अभियान यशस्वी करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात विसावा उद्यान येथे प्रातिनिधीक स्वरुपात वृक्षारोणन करुन करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात शहरातील विविध भागात वृक्षरोपण करुन लागवड करण्यात आलेले वृक्ष जोपासण्याच्या दृष्टीकोणातुन सामाजिक संघटने मार्फत ट्री गार्ड, ठिबक सिंचन, तार फेंसिंग इत्यादी आवश्यक बाबींची पुर्तता केली जाणार आहे.
पालिका आयुक्तांचे आवाहन*
"ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात शहराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि भावी पिढीला शुद्ध हवा मिळण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात किंवा परिसरात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि नांदेडला सुंदर, स्वच्छ व हरित बनवण्यास सहकार्य करावे."

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकंवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, रावण सोनसळे, राजेश जाधव, गौतम कवडे, निलावती डावरे, वृक्षमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष मुगटकर, सतीश कुलकर्णी, शैलेंद्र क्षिरसागर, नरेश यन्नावार, रवि रणखांब, कैलास अमिलकंठवार, प्रितम भराडिया सौ संध्या मुगूटकर सहशिक्षीका सौ गिरी दीपा यांच्यासह मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमी नागरीक, संस्था प्रतिनिधी, मनपा कर्मचारी व वृक्षमित्र यांची उपस्थिती होती. याप्रसंगी हरित नांदेड अभियाना संदर्भात महानगरपालिकेच्या नियोजनाची भुमिका व प्रास्ताविक उद्यान अधिक्षक डॉ.फरहतुल्ला बेग यांनी केले, उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ ब्रम्हकुमारी स्वाती बहेनजी यांनी दिली तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर यांनी केले.
या अभियानामध्ये सामाजिक संस्था वृक्षमित्र फाउंडेशन, रोटरी क्लब, गोदावरी नदी संसद, ऑल इंडीया रिन्युवेबल एनर्जि असो.,नांदेड जनरल ट्रेडर्स असोसिएशन, मेथेडिस्ट मेन्स-मेथेडिस्ट चर्च, श्री दत्तकृपा बहु. सेवाभावी संस्था वाघाळा , मातृभूमी सेवा संघ, अगरवाल महिला मंडळ, संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था, ब्रम्हकुमारीज वसंतनगर, मातृभूमी सेवा संघ, नांदेड, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल, वैश्य शिक्षक व कर्मचारी महासंघ नांदेड, फिंगर प्रिंट प्रि स्कूल, चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान, नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार नांदेड, मातोश्री जनाई बहुउद्देशी सेवाभावी, आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मातोश्री जनाई बहु. सेवाभावी संस्था येळेगाव इत्यादी संस्था सक्रिय सहभागी असणार आहेत.
नांदेड महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मागील आठ वर्षापासुन लोकसहभागातुन वृक्ष लागवड संगोपनाचे कार्य सुरु असुन *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या संकल्पनेतुन “हरित नांदेड” उपक्रमा अंतर्गत २०२६ च्या मान्सुन मध्ये महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा हद्दीत एकुण १८००० वृक्ष लागवड करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दिनांक ५ जुन रोजी विसावा उद्यान येथे वृक्षरोपण करुन करण्यात आली आहे.

नांदेड शहराचे वाढलेले तापमान नियंत्रित करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था एकवटल्या असुन नियोजनबध्द कार्यक्रमातुन वृक्षांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासन, वृक्षमित्र फाउंडेशन, गुरुव्दारा लंबर साहेब व शहरातील विविध सामाजिक संस्था एकवटल्या आहेत.या सर्वांच्या पुढाकाराने व सहकार्याने हरित नांदेड हे अभियान यशस्वी करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात विसावा उद्यान येथे प्रातिनिधीक स्वरुपात वृक्षारोणन करुन करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात शहरातील विविध भागात वृक्षरोपण करुन लागवड करण्यात आलेले वृक्ष जोपासण्याच्या दृष्टीकोणातुन सामाजिक संघटने मार्फत ट्री गार्ड, ठिबक सिंचन, तार फेंसिंग इत्यादी आवश्यक बाबींची पुर्तता केली जाणार आहे.
पालिका आयुक्तांचे आवाहन*"ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात शहराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि भावी पिढीला शुद्ध हवा मिळण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात किंवा परिसरात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि नांदेडला सुंदर, स्वच्छ व हरित बनवण्यास सहकार्य करावे."

COMMENTS