श्रीक्षेत्र माहूरमाहुर शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्त्याची रक्कम आजतागायत मिळाली नसल्याने घरकुलाची ...
श्रीक्षेत्र माहूरमाहुर शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्त्याची रक्कम आजतागायत मिळाली नसल्याने घरकुलाची कामे रखडल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. घरकुलाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात विनाविलंब जमा करा या प्रमुख मागणीसह ईतर मागण्यांसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांचेसह महिला ,जेष्ठ नागरिक,दिव्यांग घरकुल लाभार्थी नगर पंचायत समोर दि 29 जुन 2026 पासुन आमरण उपोषणाला बसले आहेत यापैकी चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने शहरात लाभार्थ्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेतमाहूर शहरात 1250 घरकुल मंजूर करण्यात आले. त्यापैकी बहुतांश घरकुलाची कामे पुर्ण झाली तर काही पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. परंतु सन 2017 ते 2019 याकाळातील घरकूल लाभार्थ्यांच्या अनुदानाची सुमारें दोन कोटी सात लाख सहाशे चोविस रुपये तत्कालीन मुख्याधीकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून सर्वेक्षण संस्थेला वळते केले याबाबत राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे व सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हाडा विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी व अधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.असे असले तरी अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी हक्काच्या अनुदानाची रक्कम देण्यात यावी,तसेच सौर उर्जा प्रकल्पातील भ्रष्टाचार, शहरातील विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली दर्जाहीन कामे, पाणीपुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे.उपोषणकर्त्यापैकी रेणुकाबाई बापूराव बाबटकर सुमनबाई पिराजी वाटोळकर प्रमिलाबाई रोडा जाधव रेणुकादास सुधाकरराव बेलखोडे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरीही प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद नाही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष 17 नगरसेवक ही मूग जुळून गप्प आहेत त्यामुळे शहरातील वातावरण दूषित होत असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तात्काळ दखल घेत उपोषणकर्त्याच्या मागण्या तात्काळ मान्य करून घरकुलधारकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे

COMMENTS