नांदेड:( दि. २ जुलै २०२६)
यशवंत महाविद्यालयात एनसीसी कक्षाच्या वतीने कॅडेट्सना बी आणि सी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे सुभेदार दत्तात्रेय उगले, नायब सुभेदार शिवाजी हरंगुले, श्री. नागरगोजे व श्री. महिपाल यांची उपस्थिती होती.
सुभेदार दत्तात्रेय उगले यांनी, एन.सी.सी. कॅडेटकडे शिस्त ही महत्त्वाची शिदोरी असून जीवनाला महत्त्वाचे वळण देणारी आहे. आयुष्य हे संघर्षमय असून निर्भीडपणे प्रत्युत्तर देणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, ते स्वतः एनसीसी कॅडेट होते; हे सांगून एनसीसीमुळे आयुष्यामध्ये विशिष्ट शिस्त निर्माण झाली आणि पुढील सर्व आयुष्यातील वाटचाल शिस्तीमुळे सहज आणि सुगम झाली. जीवनातील विविध प्रश्नांना समर्थपणे व निर्भयतेने सामोरे जाण्याचे धाडस निर्माण झाले. आयुष्यामध्ये कधी नकारात्मकता व निराशा निर्माण झाली नसल्याचा अनुभव व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानात्मक युगात विद्यार्थ्यांनी शिस्तीसोबतच विविध कौशल्य आत्मसात करून विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे नियोजन एनसीसी कक्षाचे लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर यांनी केले .
प्रारंभी प्रस्तावना जीसीआय प्रा. प्रियंका सिसोदिया यांनी केली तसेच शेवटी आभार देखील मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रशांत मुंगल यांनी सहकार्य केले.

COMMENTS