नवी मुंबई सानपाडा येथे मराठा समाजाचा वधू वर मेळावा संपन्न

नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने १० जानेवारी २०२६  रोजी केमिस्ट भवन येथे १६ वा मराठा समाजाचा वधु- वर परिचय मेळावा संपन्न झाला. मराठा विकास प्रतिष्ठान  ही संस्था २००६  पासून सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली २०  वर्षे सातत्याने कार्यरत आहे.

सध्याच्या काळात समाजामध्ये विवाहासाठी योग्य वधू-वर जुळवणे ही एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली असून, घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे त्याचप्रमाणे विवाह नोंदणीत मुलांची संख्या जास्त असून  मुलींची संख्या कमी होत चालली आहे. 

 या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विवाह जुळविण्यात  संस्थेला यश आले आहे.  अशा प्रकारे  नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुनीलशेठ छाजेड,  नगरसेवक सोमनाथ वासकर,  समाजसेवक भाऊ भापकर, तानाजी पाटील, डॉ.  मंगेश आमले,  किशोर दांगट, डिंपल ठाकूर, भावेश पाटील, डॉ. विद्या खंबाळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम आदी मान्यवरांनी वधू_वर व पालकांना शुभेच्छा दिल्या. स्वागतपर भाषण मंडळाचे सहसचिव व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी केले. प्रास्ताविक भाषण संघाचे अध्यक्ष जालिंदर भोर यांनी केले तर संघाच्या आर्थिक अहवालावर संघाचे खजिनदार विष्णुदास  मुखेकर यांनी मार्गदर्शन केले. मंडळाच्या कार्याचा आढावा संघाचे सचिव किरण नलावडे यांनी घेतला. या विवाह सोहळ्याचे सुंदर निवेदन समाजसेवक अरुण रोडे यांनी केले. मंडळाच्या सहसचिव ज्ञानेश्वर जाधव यांनी आभार मानले. याप्रसंगी समाजसेवक आबा जगताप,  कोमल वासकर, नेहा वासकर,  अजय पवार, बाबाजी इंदोरे,  सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे  सचिव जगदीश एकावडे,  खजिनदार महादेव पाटील,  संघाचे माजी उपाध्यक्ष  विठ्ठल गव्हाणे, सहखजिनदार सुभाष बारवाल , जुन्नर आंबेगाव मुलुंड मंडळाचे प्रतिनिधी भालेराव,   समाजसेवक विसाजी लोके,  शामराव मोरे,  भाऊसाहेब आहेर, मारुती शिंगोटे, विष्णू कोरडे, धंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिवाजी पाटील, कृष्णा ऊतेकर,  कांताराम जाधव, देवराम भोर, पांडुरंग वाजे, उरसळ, बोराडे,  कर्मचारी दिपाली पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यात ४००  वधू - वर व पालक  उपस्थित होते. 

आपला 

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या