लातूर : विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांचा वाढदिवस राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा कर...
लातूर : विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांचा वाढदिवस राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यानिमित्त संकुलातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व अन्नदान करून वृक्षारोपण करण्यात आले.
सुधाकर तेलंग यांनी मागील २५ वर्षांपासून शिक्षणाधिकारी पदापासून विभागीय सहसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण सचिव आदी पदांवर काम केले आहे. सध्या ते लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तेलंग यांचा ५०वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून संकुलाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कंधार तालुक्यातील गौळ या तेलंग यांच्या गावी अन्नदान करण्यात आले. यानिमित्त सुधाकर तेलंग व त्यांच्या सुविद्य पत्नी उषा तेलंग यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सुधाकर तेलंग यांनी शिक्षण क्षेत्रात राज्याचे नेतृत्व करावे, असे नमूद करून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी तेलंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वसंतराव पाटील, मुकुंद बोकारे यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी माधवराव तेलंग, लक्ष्मणराव तेलंग, ओम तेलंग, मोतीभाऊ केंद्रे, प्रा. निवृत्ती लोमटे, प्रा. एस. टी. वडजे, नारायण गाढवे, बालाजी चाटे, भारत टोंगळे, अनिल वाघमारे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना, मित्रपरिवार आणि तेलंग यांचे नातेवाईक उपस्थित होते.

COMMENTS