मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील बेटमोगरा परीक्षा केंद्रावर इयत्ता 10 वीच्या इंग्रजी विषयाचा पेपर चालू असताना अमित मारुती मादाळे ह...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा परीक्षा केंद्रावर इयत्ता 10 वीच्या इंग्रजी विषयाचा पेपर चालू असताना अमित मारुती मादाळे हा तोतया विद्यार्थी आढळून आला. या प्रकरणी तोतया विद्यार्थी, केंद्रचालक, पर्यवेक्षिका आणि परीक्षार्थी विद्यार्थी अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. 27 फेबु. ) बेटमोगरा येथील जि.प. हायस्कूल या परीक्षा केंद्रावर इंग्रजीचा पेपर सुरू होता. परीक्षार्थी बाराळे साईनाथ शिवाजीराव (बैठक क्र. L०७८३६९) याच्याऐवजी अमित मारुती मादाळे हा इंग्रजीचा पेपर देताना आढळून आला.
भरारी पथकप्रमुख ए.एल. झाडे यांच्या निर्देशानुसार पर्यवेक्षक सायलु सायन्ना करेवाड यांनी मुखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर केंद्रसंचालक तथा मुख्याधापक कांबळे दिलीप, पर्यवेक्षिका ठमके एस. एस. (गुरुदेव मा. विद्यालय मुखेड), परीक्षार्थी बाराळे साईनाथ शिवाजीराव, तोतया परीक्षार्थी अमित मारुती मादाळे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३१९ (२), भारतीय न्यायसंहिता कलम ३ (५) व विद्यापीठ, मंडळाच्या अधिनियम १९८२ कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS