महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आता शेतकरी संघटना हाच विरोधी पक्ष. - रमेश कदम पाटील

ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...

ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आयोजित केली होती. ज्येष्ठ शेतकरी दिगांबर करेवाड यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान मंदीरात बैठक पार पडली. शेती पंपासाठी नियमित वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. खत व बियाण्यांचे भाव गगनाला भिडले असून शेतीमालाला भाव मिळत नाही. शासनाने दिलेली किमान आधारभूत किंमत सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. संघटित झाल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनात आम्ही जेल भोगली असुन शरद जोशी साहेबांचे आम्ही कट्टर कार्यकर्ते आहोत अशी भूमिका प्रकाश करेवाड यांनी मांडली.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विरोधी पक्षाची जबाबदारी शेतकरी संघटनेला पार पाडावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे, गावोगावी संघटना बांधून शेतकरी सुरक्षित करा, असे आवाहन रमेश कदम पाटील यांनी केले.

आज झालेल्या बैठकीत दिगांबर करेवाड, प्रकाश करेवाड, रमेश बळवंतराव हराळे, साहेबराव गणपतराव हराळे, पिराजी तरटवाड, दत्तराव पंडागळे, सदाशिव वाघमारे, मारोती बलपलवाड, विनोद गंगाधर वानखेडे, आत्माराम नारायण वानखेडे, अवधूतराव बळवंतराव हराळे, प्रविण दत्ता हराळे, भगवान विठ्ठलराव हराळे, गुलाबराव माणीकराव हराळे, मुकिंदा नामदेव शिलेवाड, विजय गंगाधर आगलावे, राजु झंकारे 

संभाजी सुर्यवंशी, किसनराव करेवाड इत्यादी शेतकरी बांधवांनी बिल्ला लावून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या बैठकीस नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील व निवृत्त अभियंता बळीराम मिराशे उपस्थित होते.


# शेतकरी संघटनेची घोडदौड, कोल्हारी येथे शाखा स्थापन.

# इस्लापूर सर्कल मध्ये राजकीय उलथा-पालथ, कोल्हारी येथे शेतकरी संघटनेची शाखा स्थापन.

# किनवट तालुक्याच्या राजकारणात भुकंप, कोल्हारी येथे शाखा स्थापन.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group