हदगाव शहरातील नामवंत वकील ॲड. उत्तमराव टिकोरे साहेब यांचे अल्पशा आजाराने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास दुःखद न...
हदगाव शहरातील नामवंत वकील ॲड. उत्तमराव टिकोरे साहेब यांचे अल्पशा आजाराने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.
सन्माननीय टिकोरे साहेब हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच न्यायालयीन क्षेत्रात अत्यंत पारंगत आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी हदगाव शहरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आपल्या ज्ञान, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांनी सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.त्यांच्या अकाली जाण्याने सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि न्यायालयीन सर्वच क्षेत्रांत एक मोठी व न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा अंत्यविधी हदगाव शहरालगत असलेल्या कौठा येथील शेतामध्ये आज दुपारी 3.00 वाजता होणार आहे.

COMMENTS