श्रीक्षेत्र माहूर श्रीदत्त शिखर संस्थानवर ब्रह्मलीन झालेले प. पू. प. महंत मधुसूदनजी भारती महाराज यांचे प्रित्यर्थ रविवार दि.19 एप्रिल रोजी ष...
श्रीक्षेत्र माहूर श्रीदत्त शिखर संस्थानवर ब्रह्मलीन झालेले प. पू. प. महंत मधुसूदनजी भारती महाराज यांचे प्रित्यर्थ रविवार दि.19 एप्रिल रोजी षोडशी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या महापूजेसाठी आचार्य महामंडलेश्वर प. पू. अवधेशानंदजी गीरी महाराज जुना आखाडा तथा कुंभमेळा प्रमुख महामंत्री प. पू. श्रीहरी गीरीजी महाराज,प. पू. श्री प्रेम गीरीजी महाराज, सभापती प. पू. श्री मोहन शास्त्रीजी महाराज आदींची उपस्थिती लाभली.यावेळी संस्थानचे वतीने धर्मसभेच्या व्यासपीठावर असलेल्या सर्व महापुरुषांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
महामंडळेश्वर प. पू. अवधेशानंद गिरीजीं महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीतून सुमारे एक तास प्रवचन केले, त्याचा दत्त भक्तांनी लाभ घेतला.श्रीदत्त शिखर संस्थानचे ब्रह्मलीन महंत प. पू. प. मधुसूदनजी भारती महाराज या महायोग्याचे महाप्रयाण शनिवार दि. 4 एप्रिल रोजी झाले होते.त्यांचे प्रित्यर्थ महंत प. पू. प. डॉ. धनेश्वरजी भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात आजचा षोडशी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला साधू, संत,महंत आणि हजारो दत्तभक्तांची उपस्थिती होती.धर्मसभेनंतर महाप्रसादाचे वितरण केले गेले रात्रीला महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे, सोमवारी सकाळी काकडा आरतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे या कार्यक्रमासाठी हजारो दत्त भक्तांनी आलेल्या भाविकांना कुठलीही कमतरता भासू न देता मनोभावे सेवा केली

COMMENTS