माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, माहूरच्या वतीने एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिक, प्रवासी व भाविक भक्तांसाठी 'थंडगार पिण्याच्या पाण्याची' पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
सध्या वाढत्या उन्हाळ्याची दाहकता आणि बस स्थानकावर येणाऱ्या प्रवासी व भाविकांची पिण्याच्या पाण्याअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन, गोपू महामुने यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हा लोकउपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. आमदार भीमराव केराम यांच्या कार्यप्रेरणेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांकडून या सामाजिक कार्यास मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिलजी वाघमारे, डॉ. निरंजन केशवे, ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, विजय आमले, पत्रकार सुरेश गिऱ्हे, गजानन भारती, अपील बेलखोडे, राज ठाकूर, राम दातीर, महिला तालुकाध्यक्ष पद्मा गिऱ्हे, शहराध्यक्ष स्वातीताई आडे, गौरव जयस्वाल, अमोल धनावत, निलेश तायडे, अशोक जोशी, रोनक दीक्षित, किशोर अत्राम, नवनीत देवपूलवार, निखिल शिंदे व राजू मगरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देणाऱ्या गोपू महामुने यांनी आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली एक आदर्श पायंडा पाडला आहे. या उपक्रमाचे माहूर शहर आणि परिसरातून स्वागत केले जात असून, आगामी काळातही अशाच प्रकारच्या जनकल्याणाच्या उपक्रमांची परंपरा कायम राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS