देगलूर प्रतिनिधी
श्रीक्षेत्र ईश्वरपुर (ईब्राहिमपुर) येथे चालु असलेल्या रामकथेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे
ज्ञान विज्ञान आध्यात्म अनिष्ट रूढी परंपरा श्रध्दा अंधश्रद्धा अशी अनेक दाखले देत समाजाचे योग्य प्रबोधन होणे काळाची गरज आहे व
समाजाला योग्य मार्गदर्शन दर्शन कथेतून केले जात आहे.
एक कथा प्रवक्ता शेकडो समाजाला ज्ञान देतो. परंतु एक पत्रकार आपल्या लेखणीतुन हजारो भक्तांना घरबसल्या ते तत्त्वज्ञान सहज उपलब्ध करत असतो.
असाच एक पत्रकार श्री नरेंद्र येरावार गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक व्यावसायिक तथा आध्यात्मिक विचार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे उत्थान करत आहे व नुकताच त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन दर्पणरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. या कथेला संगीत साथ तबलावादक श्री अक्षय माने कौठाळी, सिंथ व गायक श्री अनिल महाराज मुकीर, पॅड वादक श्री ज्ञानेश्वर देशपांडे व झाकी दर्शन श्री संतोष महाराज गाडे अमरावती यांनी केले
रामकथेचे सौजन्य श्री बालाजी पाटील बामणे यांनी स्विकारले असुन समस्त गावकरी अन्नदान, कीर्तन पारायण मोठ्या प्रमाणात केले आहे.
कथाकार जसे आपल्या कथेतून समाज प्रबोधनाचे कार्य करतात त्याचप्रमाणे एक पत्रकार देखील आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात असेही प्रसिद्ध कथाकार ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांनी सांगितलं आहे

COMMENTS