शिर्डी/नांदेड: नांदेड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. शिर्डी येथे पार पडलेल्या के.पी. क्रिकेट अकॅडमी आयोज...
शिर्डी/नांदेड: नांदेड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. शिर्डी येथे पार पडलेल्या के.पी. क्रिकेट अकॅडमी आयोजित 'डे-नाईट अंडर-१७ चॅम्पियनशिप' मध्ये नांदेडच्या सुप्रसिद्ध शुभम क्रिकेट अकॅडमीने आपला दबदबा निर्माण करत दिमाखात विजेतेपद पटकावले आहे. सलग चार सामने जिंकून या संघाने मैदानावर नवा इतिहास रचला.🏆 विजयाचे मानकरी आणि वैयक्तिक कामगिरी
केवळ सांघिक खेळच नव्हे, तर वैयक्तिक कामगिरीमध्येही शुभम क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंनी बाजी मारली:
कर्णधार समर्थ नानवटे याच्या नेतृत्वाखाली संघाने हे यश संपादन केले. या ऐतिहासिक विजयानंतर अकॅडमीचे संचालक व हेडकोच शुभम लोहार सर यांनी खेळाडूंचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य सुनील नानवटे सर यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा नांदेडमध्ये विशेष सत्कार करण्यात आला.
विजेता संघ: समर्थ नानवटे (कर्णधार), अनन्या पंगटवाड, केतन पांचाळ, राजवीर काशीद, रितेश परभाते, रुद्र बागडी, शैलेश माळाकोळी, शौर्य देशमुख, श्रीवेद जोशी, सोहम केंद्रे, तक्ष बनोदे, विजय कदम, विराज राठोड.
या यशामुळे सर्व पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: तक्ष बनोदे (सर्वाधिक १७२ धावा, हायेस्ट स्कोर ९५ आणि सर्वाधिक गुण).
- बेस्ट बॅट्समन: राजवीर काशीद (८४ धावा).
- बेस्ट बॉलर: केतन पांचाळ (६ गडी बाद).
- बेस्ट फिल्डर: विजय कदम (५ उत्कृष्ट झेल).

COMMENTS