नांदेड (प्रतिनिधी)- ग्रंथालय चळवळ ही केवळ पुस्तके देण्यापुरती मर्यादित नसून समाजाला विचार, संस्कार व दिशा देणारी चळवळ आहे. समाजात ज्ञानाचा प...
नांदेड (प्रतिनिधी)- ग्रंथालय चळवळ ही केवळ पुस्तके देण्यापुरती मर्यादित नसून समाजाला विचार, संस्कार व दिशा देणारी चळवळ आहे. समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी वाचनालयांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी केले.
स्व. खासदार वसंतराव चव्हाण व कै. माजी आमदार गंगाधर पटणे यांच्या संकल्पनेतून कै. अमृतराव पाटील व इंदिरा सार्वजनिक वाचनालय यांच्या सौजन्याने आयोजित नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे 28 वे वार्षिक अधिवेशन नायगाव येथील जनता हायस्कूलच्या प्रशस्त सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. त्यावेळी उद्घाटक म्हणून खा.रवींद्र चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी गजानन कोटेवार, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, नंदाबाई गंगाधरराव पटने, सुनिल हुस्से,श्रीनिवास पाटील,राम मेकले,अविनाश देशपांडे हसनाळकर,उमाकांत देशपांडे,शिवाजीराव धर्माधिकारी, अनिल सुर्यवंशी,प्रताप सुर्यवंशी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अधिवेशनाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमात वाचन संस्कृती संवर्धन, ग्रामीण भागातील ग्रंथालयांची सद्यस्थिती, शासनाच्या विविध योजना, ग्रंथालयांचे संगणकीकरण व डिजिटल सुविधा, ई-पुस्तकांचा वापर, तसेच युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणार्या उपक्रमांवर सखोल चर्चा झाली. डिजिटल युगात ग्रंथालयांनी काळानुरूप बदल स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
अधिवेशनात जिल्ह्यातील काही उत्कृष्ट कार्य करणार्या वाचनालयांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच आगामी वर्षात ग्रंथदालन विस्तार, वाचन प्रेरणा शिबिरे, पुस्तक प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम आणि वाचन महोत्सव आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, स्वयंसेवक, सहकार्य करणार्या संस्था तसेच उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशा अधिवेशनांमुळे वाचन संस्कृतीला चालना मिळून समाजात ज्ञानपरंपरा अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाने आज जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीला एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अधिवेशनास राजेंद्र हंबीरे, निर्मलकुमार सुर्यवंशी, रामराव कोरे, संजय पाटील, पुंडलिक कदम, सतीशकुमार देशमुख,सौ.ललिता गोणारकर,गोविंद फाजगे,नरसिंग कदम,गोविंदराव वडगावक यांच्यासह जिल्ह्यातील विविध सार्वजनिक वाचनालयांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, ग्रंथपाल उपस्थित होते.

COMMENTS