मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथिल जिल्हा परिषद हायस्कूल परिक्षा केंद्र क्रमांक 5235 या परिक्षा केंद्रावर इयत्ता (SSC) दहावी च्या परिक्षेला 20 फेबु. पासून कॉपी मुक्त वातावरणात सुरुवात झाली असून
या केंद्रात जिजामाता माध्यमिक विद्यालय जाहूर, वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय बिल्लाळी, महात्मा गांधी विद्यालय चांडोळा, संताबाई माध्यमिक शाळा पाळा, जिल्हा परिषद हायस्कूल जाहूर,
या शाळेचा समावेश आहे. या परीक्षा केंद्रात एकूण 204 विद्यार्थी परीक्षा देत आहेत, दहावी बोर्ड परीक्षेच्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांनी दहावीच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात होण्यासाठी व संबंधित परीक्षा सेंटर वर कुठलाही गैर प्रकार होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेले आहेत. जाहुर येथील जिल्हा परिषद हायस्कूल परिक्षा केंद्र क्रमांक 5235 या परिक्षा केंद्रावर केंद्र संचालक सुधाकरराव मामीलवाड सर, जिल्हा परिषद जाहूर हायस्कूल चे मुख्याध्यापक मोरे सर इतर कर्मचारी तसेच मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी कोणता हि गैर प्रकार न होता. कॉपी मुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा होत आहेत.

COMMENTS