नरेंद्र येरावार उमरी आर्य वैश्य समाजातील बेघरांसाठी घरकुल योजना विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा आणि श्रीक्षेत्र अयोध्येत भक्त निवास उभारण्याचा अधिवेशनात सर्व सम्मतीने ठराव परित करण्यात आला असून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात अयोध्येतील महासभेचे जिल्हा कार्यकारी मंडळाचे अधिवेशन संपन्न झाले.
अध्यक्षस्थनी माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार तर उदघाटक म्हणून आमदार समीरभाऊ कुणावार उपस्थित होते
प्रभू श्रीराम श्री वासवी माता श्री रंगनाथ महाराज गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने आणि महाराष्ट्र गीताने अधिवेशनाचा प्रारंभ झाला. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व आमदार समीर कुणावार यांचे महिला महासभेकडून स्वागत गीताने विशेष स्वागत करण्यात आले.
उदघाटक आमदार समीर कुणावार यांनी महासभेच्या सर्वचं कामाचं कौतुक करून महासभेच्या कार्या मुळे संघटन महत्व कळले आहे. विदयार्थ्यांना घडविण्यासाठी अभ्यासिका वं स्पर्धा परीक्षेच मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घावा यासाठी सर्व सहकार्य करुत अशी ग्वाही दिली
तर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी LKK लोग क्या कहेंगे याकडे लक्ष न देता आपण आपलं कार्य करीत समाजाची उन्नती करत समाजसेवा करून उत्तम कार्य करावे असे त्यांनी स्पष्ट करताना आजवरच्या महासभेच्या कार्याचा गौरव केला. महासभेच्या सर्वच कार्यासाठी मी सदैव तत्पर असेल असे त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी सौ सपनाताई
मुनगंटीवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना महासभेचे कार्य हे अतिशय उत्तम कार्य चालते. महासभेच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन उभे राहिले असून यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्यामुळेच आयोध्या अधिवेशनात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. हे त्यांनी ओळखले याचवेळी श्री काशी अन्नसत्रमचे महासचिव विलास बच्चू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजातील चालीरीती रूढी परंपरा याबद्दल मत व्यक्त करून मुलीच्या संसारात आईचा वाढता हस्तक्षेप ही बाब चिंतनी असून याबद्दल जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले प्रमुख पाहुणे दिलीपभाऊ कंदकुर्ते बांधकाम समितीचे अध्यक्ष डॉ.श्री सूर्यकांत शिरपेवार राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार यांचे यावेळी समायोचित भाषण झाले. महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी आजवर केलेल्या महासभेच्या सर्व कार्याचा आणि सध्याच्या परिस्थितीत समाजामध्ये निर्माण झालेल्या एक विश्वासाच्या नात्याचा उच्चार करीत समाज बांधवांच्या सहकार्याने महासभा ही उंच शिखरावर पोहोचली असून ती स्वयंपूर्ण बनण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यावर भर दिला जाईल अनेक उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येईल असे विश्वास पूर्ण मत मांडले.
समाज बांधवांच्या माध्यमातून तिरुपती येथील भक्तनिवास बांधकामासाठी समाज बांधवांनी दिलेली भरभरून मदत ही महासभेच्या विश्वासाची पावती आहे असे मत व्यक्त करून महासभेच्या वतीने श्रीक्षेत्र अयोध्या या ठिकाणी भक्तनिवास उभारण्याचा संकल्प या अधिवेशनात करतात उपस्थित पदाधिकाऱ्याकडून टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात भक्तनिवास करा, यावर श्री रामचंद्र की जय....जय श्रीराम अशा घोषणा देऊन ठराव मंजूर करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. समाजातील गरजवंत अशा बेघर कुटुंबांना घरकुल उभारण्यासाठी योजना महासभेच्या माध्यमातून निश्चित करण्याचा ठराव संमत झाला.भक्तनिवास अभ्यासिका आणि घरकुल योजना यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना ही यावेळी करण्यात आली. महिला महासभेच्या वतीने सौ. माधुरीताई कोल्हे, सौ. सुलभा वट्टमवार, डॉ. सौं. ढमढेरे यांनी समायोचित मार्गदर्शन केले. या अधिवेशनात प्रत्येक जिल्हाध्यक्ष, महिला महासभा जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्याचा आढावा सादर करून नवीन उपाययोजना नवीन प्रकल्प याबाबत मत व्यक्त केले. प्रास्ताविक महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई यांनी सविस्तर पणे मांडून आजवरच्या महासभेच्या कामाचा आलेख सादर केला. अयोध्येतील अधिवेशन नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी उत्कृष्टआयोजन व नियोजन केल्यामुळे त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याच समितीची भक्तनिवास उभारण्यासाठी निवड करण्यात आली. यामध्ये प्रमुख शिरीष मनाठकर, राजू नळदकर, विलास कोटगिरे, ज्ञानेश्वर आय्या, अमोल फुटाणे यांची निवड करण्यात आली. घरकुल योजनेसाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून नागपूर येथील बांधकाम उद्योजक दीपक निलावार यांची तर अभ्यासिकेसाठी जया ताई चिंतावार, सुषमा कोटगिरे यांची निवड करण्यात आली. अधिवेशनात गंगाखेड येथील महिला भगिनीचे स्वागत गीत कार्यक्रमाचे विशेष लक्ष ठरले. सौं सुरेखा कोकड यांनी समाज स्फूर्ती गीत सादर केले तर सौ. सुलभा वट्टमवार यांनी भाव गीत सादर करून सभागृह मंत्रमुग्ध केले.
राज्याच्या 20 जिल्ह्यातून जिल्हा पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी होते. अधिवेशनच्या निमित्ताने समारोपच्या दिवसी अयोध्येतील जानकी महल ते छोटी छावणी सत्संग भवन पर्यंत भव्य शोभायात्रा काढली. त्यामुळे प्रभु रामचंद्राच्या अयोध्येत पंढरी अवतरली होती. दरम्यान दानशूर देणगीदार भक्त व्यकटेश गादेवार, अनिल मनाठकर, दीपक निलावार यांचा सत्कार करण्यात आला. अयोध्येतील महासभा अधिवेशनामुळे समाजासाठी नवं चैतन्य निर्माण झाले.

COMMENTS