मुंबई दि.२१: ग्रामीण गिरणी कामगारांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षे अहर्निश लढणा-या "महाराष्ट्र राज्य ग्रामीण कापड आणि तत्सम उद्योग कामगार महासंघा"च्या अध्यक्षपदी महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची अभिनंदनीय निवड झाली आहे.
या फेडरेशनची सभा नुकतीच मुंबईत राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे पार पडली.अध्यक्षस्थानी फेडरेशनचे कार्याध्यक्ष मच्छींद्र येरडावकर होते.फेडरेशनचे भूतपूर्व अध्यक्ष हरिभाऊ नाईक यांचे जून २०२२ मध्ये निधन झाले.या रिक्त जागी लढाऊ कामगार नेते गोविंदराव मोहिते यांची एकमताने निवड करण्यात आली.
त्या वेळी विश्वस्त सर्वश्री श्यामसुन्दर यादव,जी.बी.गावडे, नौशाद देसाई, खजिनदार सुदाम शिंगणे आदी सदस्य उपस्थित होते.
आज महाराष्ट्रातील अनेक सुतगिरण्या बंद असून, कापड गिरण्यावर आधारित अनेक उद्योगातील कामगारांचे प्रश्न अनिर्णित अवस्थेत आहेत.त्यातून बेरोजगार समस्या चिंताग्रस्त होऊन बसली आहे,अशा वेळी गोविंदराव मोहिते यांच्या सारखे खंबीर नेतृत्व या प्रश्नाचा लढा यशस्वीरित्या पुढे नेतील,असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी व्यक्त केला.गोविंदरा मोहिते यांच्या निवडीचे सर्वत्र जोरदारपणे स्वागत होत आहे.
आपल्या नियुक्तीवर बोलताना गोविंदराव मोहिते यांनी सांगितले, महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातील सूतगिरण्यातील कामगारांच्या प्रश्नाबरोबरच,कापड गिरण्यावर आधारित विविध तस्तम उद्योगातील असंख कामगारांच्या अन्यायावर फेडरेशन निश्चितचपणे आपला आवाज उठविल!
या सभेत दिवंगत अध्यक्ष हरिभाऊ नाईक यांनी कामगारांच्या प्रश्नावर आजपर्यंत जो लढा नेटाने पुढे नेला, त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करण्यात आले.
मुंबईसह, नागपूर, कळमेश्वर, हिंगणघाट, पुलगाव,कारंज्या, अकोला,औरंगाबाद, धुळे, चाळीसगाव, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी,अचलपूर, बार्शी आदी ग्रामीण भागात कापड कामगार आणि या उद्योगावर आधारीत तत्सम उद्योगातील कामगारांचा रोजगार
धोक्यात आला,त्यावर तिव्र लढा उभा करण्याचा या सभेत एकमुखी निर्णय घेण्यात आला.**

COMMENTS