नांदेड.(विशेष प्रतिनिधी) केंद्र सरकारने पेट्रोल व गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख बोंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नांदेडातील 'सिडको' शहरप्रमुख गजानन राजरवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी २६ मार्च रोजी दुपारी नांदेडच्या 'सिडको' परिसरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.
केंद्र शासनाकडून पेट्रोल व गॅसची दर वाढ करण्यात आली. या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे 'सिडको' शहरप्रमुख गजानन राजरवार व त्यांचे सहकारी पदाधिकारी, शिवसैनिकांनी २६ मार्च रोजी दुपारी नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक चुलीवर स्वयंपाक करून आंदोलन केले.
प्रारंभी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'सिडको'तील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून इंधन दरवाढीचा निषेध केला. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर, तालुका प्रमुख उध्दव शिंदे, शहरप्रमुख तुलजेस यादव व 'सिडको' शहरप्रमुख गजानन राजरवार, माजी शहरप्रमुख निवृत्ती जिकंलवाड यांच्यासह अशोक कामठेकर, नंदु वैद्य, गणेश जैस्वाल, सुरेश लोट, सतिश खैरे, पप्पु गायकवाड, सुग्रीव वाघमारे, संजय साबणे, अशोक पाटील, निकीता शहापुरवाड, माधव भिसे, आनंदा वाघमारे, संदिप जिल्हेवाड, कृष्णा पांचाळ, विष्णू कदम, संभाजी जाधव, सूर्यकांत गायकवाड, पंडीत गजभारे व त्यांच्या सहकारी-पदाधिकारी शिवसैनिकांचा सहभाग होता.
या आंदोलनादरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. बाबूराव केंद्रे, सपोउपनि. परमेश्वर कदम, सपोउपनि. ज्ञानोबा गिते, पोलीस हेडकॉन्स्टेबल साहेबराव मुपडे, शेख जावेद व आशा केंद्रे, विशेष शाखेचे पोलीस नाईक बालाजी दंतापले, पोलीस नाईक ज्ञानेश्वर गव्हाणकर व नामदेव सुर्यवंशी यांच्यासह त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौक परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS