माहूर (प्रतिनिधी)पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरांसह खेड्यापाड्यात फिरून मोठया प्रमाणात...
माहूर (प्रतिनिधी)पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरांसह खेड्यापाड्यात फिरून मोठया प्रमाणात सदस्य नोंदणी करावी असे आवाहन वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक तथा काँग्रेसचे युवा नेते डॉ. निरंजन केशवे यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने सध्या राज्यभर डिजिटल सदस्य नोंदणी अभियान सुरु असून ते दि.31 मार्च पर्यंत चालणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या विकास कामाची माहिती व पक्षाचे ध्येय धोरण घराघरात पोहचवून या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी माहूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानात हिरीरीने सहभाग घेऊन अभियान सफल करावे अशी विनंती डॉ. निरंजन केशवे यांनी केली आहे.

COMMENTS