नायगांव प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
कुंटुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी श्री करण सिंग यांची बदली परतुर जालना येथील ग्रामीण बँकेमध्ये झाली आहे. श्री करण सिंग यांनी तीन वर्ष कुंटूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कारभार पाहिला त्यांनी सर्व घटकातील लोकांना योजनेसाठी कर्ज मिळवून दिले पिक कर्ज सहा कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक के अंतर्गत महिला बचत गटांना 64 लाखाचे वाटप करण्यात आले .दरवर्षी महिला बचत गटांना कर्ज वाटप करून त्यांना उद्योगाला विविध प्रकारे अर्थसाह्य करतात त्यातून त्यांना मार्गदर्शन व चांगल्या प्रकारे नियमित परतफेड करण्याची सवय अशा विविध घटनांची माहिती दिली जाते. महिला सदस्य त्यांचे आरडी त्यांचे विमा पॉलिसी अशा पद्धतीने महिलांना सहकार्य करत आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक कर्ज योजना लोकांना देऊन त्यांनी अनेक घरकुल बांधकाम साठी अर्थसाहाय्य मिळवून देऊन त्यांना अर्थसाह्य केले त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये कर्ज देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत केली असून बँकेमार्फत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी महिला बचत गटाच्या सीआरपी रेखाताई कांबळे कुंटूरकर यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत केले व त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला .
यावेळी गावातील सर्व घटकातील नागरिक उपस्थित होते यावेळी शंकर नरहरी अरगुडलवाड सेवक, राहुल रोहणकर कॅशियर, गोपाळ कदम, सातेगाव येथील प्रकाश पाटील जाधव माजी सरपंच वेळी उपस्थित होते त्यानंतर रेखाताई कांबळे ,बालाजी शिळे,अनिल तोडे , अनिल कांबळे पत्रकार असे लोकांनी त्यांना सत्कार करून पुढील भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS